
शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन प्राथमिक विद्यामंदिर भगूर
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
भगूर .आज दिनांक १९/८/२०२५ रोजी नूतन प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत गणपती उत्सवा निमित्त पर्यावरण पूर क शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा व शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन प्राथमिक विद्यामंदिर व नूतन प्राथमिक पूर्व बालक मंदिर शाळेत कृष्णाष्टमी साजरी करून गोपाळकाला निमित्त दहीहंडी चा उपक्रम राबविण्यात आला .यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कृष्ण राधिकाचे वेशभूषा धारण करून त्यावर नृत्य सादर केले. व विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद तसेच बालक मंदिर मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख व शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या. सर्वांचे सहकार्याने कार्यक्रम अतिशय सुंदर होते पार पाडला. अतिशय उत्साहात पार पडली यावेळी इयत्ता चौथीतील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणपती तयार केले गणपती कार्यशाळेसाठी शाळेतील उपशिक्षक श्री. आनंद कस्तुरे सर व श्रीमती भागवत मॅडम यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले . इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गणपती तयार केले. शाळेचा मुख्याध्यापिका सौ. रंजना सोनवणे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीची कला व कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला सर्व शिक्षक मुख्याध्यापिका पालक यांनी कौतुकाचा वर्षाव केला

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


