

प्रेस नोट – न्यायालयीन बदली कामगारांना डावलून सरळ सेवा भरती – प्रशासनाचा न्यायालयाच्या आदेशांचा अवमान
सांगली, दि. २५/०८/२०२५न्यायालयीन बदली कामगारांना कायम कामगार ऑर्डर हातात द्या. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवावी.या मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती सांगली यांना, आदरणीय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे.त्यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,सांगली व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली २५ ते ३० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या न्यायालयीन बदली कामगारांना कायम न करता प्रशासनाने चतुर्थ श्रेणी “वर्ग ४” संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे.या कृतीमुळे न्यायालयीन बदली कामगारांच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणली जात असून मा. मेट कोर्ट मुंबई यांनी आपल्या निर्णयात नमूद केले की, जसजसा रिक्त जागा राहतील तसे या बदली कामगारांना कायम करावे. असे असताना या बदली कामगारांना डावलून सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे, मा. मॅट कोर्ट मुंबई तसेच मा. लेबर कोर्ट सांगली यांच्या निर्णयांचा अवमान होत आहे, असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे.प्रमुख मागण्या :1. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम रिक्त जागांवर न्यायालयीन बदली कामगारांना कायम करावे.2. त्यानंतरच उर्वरित जागांसाठी “सरळसेवा भरती प्रक्रिया” राबवावी.3. वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या बदली कामगारांच्या सेवेतून संबंधित प्रशासनाने अन्यायकारक वर्तन त्वरित थांबवावे.युनियनचा इशारा :न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करून प्रशासनाने सरळसेवा भरती सुरूच ठेवली, तर या संदर्भात कायदेशीर दावा दाखल करण्यात येईल.झालेल्या नुकसानीस जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष (मा. जिल्हाधिकारी), सदस्य/सक्षम प्राधिकारी (मा. अधिष्ठाता) तसेच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा सदस्य रूपेश तामगावकर, विशाल कांबळे, किशोर आढाव यांच्या बरोबरच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड, महोन गवळी, प्रकाश गायकवाड, शोभा पोतदार, सुमन कामत, धर्मेंद्र कांबळे, अनवर कुरणे, शशिकांत जाधव, मुरलीधर कांबळे, मनोज कांबळे, रशीम सय्यद, रमेश साळुंखे, सुनील आवळे, राजु कांबळे, संजय कांबळे, भारत खाडे, शरद कांबळे, राजेंद्र आठवले, महोन आवळे, किरण वायदंडे, बापू वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव


