

धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित नाशिकच्या दान पारमिता फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी – डॉ शाम जाधव
नाशिक. धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित दान पारमिता फाउंडेशन नाशिक आयोजित अशोक स्क्रिप्ट इन्स्टिट्यूट अंतर्गत सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त विश्व धम्म लिपी गौरव दिवस कार्यक्रमाचे आयोजन येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आले होते सर जेम्स प्रिन्सेप ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सर्वात अगोदर धम्मलिपिची वर्णमाला बनवली शिलालेखाचे माहिती संकलन (डॉक्युमेंटेशन) केले.सम्राट अशोक ह्या भूमीत होऊन गेला.त्यांनी ह्याचे संशोधन त्यांनी केले.मातीखाली दडलेल्या बौद्ध इतिहासाला प्रकाशित करण्याचे व मृतावस्थेत असलेल्या धम्मलिपिला पुनर्जीवित करण्याचे कार्य सर जेम्स प्रिन्सेप यांनी केले ते कार्य दान पारमिता फाऊंडेशन रचनात्मक पद्धतीने करत असून ह्या कामात युवकांनी स्वतःला अर्पित करावे असे मत धम्मलिपी व बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी व्यक्त केले.परशुराम सायखेडकर नाट्यगृह,शालिमार नाशिक येथे संपन्न झालेल्या विश्व धम्मलिपी गौरव दिवस सुप्रसिद्ध वक्त्या प्रा.जयश्री खरे-बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध साहित्य संस्कृतीचे अभ्यासक, धम्मलिपीतज्ञ अतुल भोसेकर, प्रा.शरद शेजवळ, नागार्जून वाडेकर हे मान्यवर उपस्थित होते. गेल्या ५ वर्षांपासून दान पारमिता फाऊंडेशन ही धम्मलिपिचे निःशुल्क वर्ग दर महिन्याला ऑनलाइन माध्यमातून आयोजित करत असते व विद्यार्थ्यांना धम्मलिपि शिकून झाल्यावर त्यांची एका लेणींवर कार्यशाळा आयोजित केली जाते व त्यांच्याकडून धम्मलिपि मध्ये असलेल्या शिलालेखाचे वाचन करून घेतले जाते,धम्मलिपि शिकल्याचे प्रमाणपत्र लेणींवर व धम्मरत्न पुरस्कार ———- यांच्यासह मीनाक्षी शेगावकर ,नाशिक,संघमित्रा जाधव ,मुंबई ,कविता हिवाळे – मुंबई,वंदना कुरणे नवी मुंबई,ऐरोली,कविता भालेराव – नाशिक,रोहिणी जाधव नाशिक,वृषाली माने-मुंबई,वैशाली आहिरे श्रीरामपूर,सविता धमगाये नागपूर, सरोज वाणी- नागपूर,धम्मनायिका महिला संघ,नाशिक,गायिका आम्रपाली पगारे, येवला,दीपा पवार मुंबई,ऍड रागिणी तायडे बुलढाणा,प्रगती नाईकनवरे पुणे,सुचित्रा गांगुर्डे नाशिक,प्रगती मेश्राम चंद्रपूर, ज्योती गायकवाड नाशिक, माधुरी सपकाळे बोराळे कल्याण,दिपश्री माने बलखंडे- कल्याण,अशोका पवार इगतपुरी, रुणाली जाधव, स्वप्ना थोरात नाशिक यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
विश्व धम्मलिपी गौरव दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मलिपी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, शिक्षक,प्रशिक्षक,व सुनिल खरे, संतोष आंभोरे, प्रवीण जाधव, रुपाली गायकवाड,भगवान पगारे, आकाश हजारे, संतोष जाधव, राजु पगारे, रुपाली पगारे, निर्झरा रामटेके, ज्ञानेश्वर सोनवणे,अलका गवई, अर्चना वाघमारे, शांता मुलगे, प्रगती मेश्राम, ज्योती खैरमोडे, वंदना नाईक, मंगला बोढारे, माधवी शिरसाठ, अनिल बागुल, राहुल बागले, वंदना झाल्टे, विजया उमाळे, संध्या ठमके, पल्लवी नाईकनवरे, किरण सोंडे, मिलिंद तेलुरे, दिलीप वासनिक, सुभाष चौथमल, सचिन म्हस्के, यशवंत दाणी, सुनंदा साबळे,दान पारमिता फाऊंडेशनचे सर्व संचालक हितचिंतक प्रयत्नशील आहेत.अल्पोहाराची व्यवस्था राहुल बागले ह्यांनी संस्थेच्या वतीने केली होती, तर संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक दान पारमिता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील खरे ह्यांनी केले, सूत्रसंचालन रुपाली गायकवाड,आकाश हजारे, स्वागत गीत विजया उमाळे,आभार सहसंस्थापक सचिव संतोष आंभोरेयांनी मानले.कार्यक्रमास नागपूर, पुणे, गोंदिया, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई मधील धम्मलिपी अभ्यासक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


