
अखेर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्त्याचे उपोषण कारभारी सुखदेव सानप यांचे उपोषण आठ दिवसांनी सोडवण्यात यश
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट मुक्काम पोस्ट गुळवंच तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ट्रस्टच्या विरोधात उपोषण कर्ता श्री कारभारी सुखदेव सानप यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस होता. आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या आवाजाने आमचे प्रतिनिधी श्री रामचंद्र ताठे व रमेश गिरी गोसावी यांनी उपोषणास बसलेले श्री कारभारी सुखदेव सानप यांच्या उपोषणासाठी आणि त्यांना त्यांच्या उपोषणांमधून न्याय मिळवून न्याय मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.आणि त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले.माननीय जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून येथील उपोषण आपण किती दिवस बसलात तरी, याचा काही फायदा होणार नाही.कारण तुमच्या जमिनीचा व्यवहार आणि त्या ट्रस्टीला मिळालेली संमती ही हायकोर्टाकडून मिळालेली आहे.त्यामुळे त्याचा अधिकार आमच्या कडे नसून तो अधिकार हायकोर्टाकडे आहे. त्यामुळे, हे उपोषण तूर्तास आपण मागे घ्यावे. आणि पुढील अपील ही आपण हायकोर्टाकडे करावी अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार नाशिक यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाशी बोलताना सांगितले. आणि उपोषणकर्त्याचे उपोषण हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून सोडविण्यात आले. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे आभार मानलेत. वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाकरिता कॅमेरामन रमेश गिरी गोसावी तसेच प्रतिनिधी रामचंद्र ताठे यांचेही सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


