
प्रेस नोट
*“राखीव निधीच्या गैरवापराचा आरोप, चौकशी समितीची मागणी”*
सांगली मिरज. कुपवाड आज दिनांक १६/९/२०२५ रोजी कुपवाड शहरातील दलित वस्तीत पाणी गटार व नागरी तात्काळ सुविधा द्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने दिले, आयुक्त महानगरपालिका यांना, नागरि समस्यांवर चर्चा करून लेखी निवेदन.या अनुषंगाने, आयुक्तांनी शुक्रवार दिनांक १९/०९/२०२५ रोजी सदरच्या भागातील नागरि समस्याचे निराकरण करण्यासाठी, भागातील नागरिक व युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर तातडीची बैठक आयोजित केली आहे.राजारामबापू हौसिंग सोसायटी, लोकनायक हौसिंग सोसायटी मोठ्या संख्येने, गोरगरीब श्रमिक कष्टकरी, कामगार – कर्मचारी हे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत नागरिकांना गेल्या 20 वर्षांपासून पिण्याचे पाणी, गटर लाईन व स्वच्छतेच्या मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. यासंदर्भात अनेक वेळा महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्यामुळे, वंचित बहुजन आघाडी सांगली यांच्या वतीने संबंधित भागातील हजारो महिलांनी दिनांक २४ मे २०२५ रोजी “घागर मोर्चा” काढून प्रभाग समिती क्र ३ कुपवाड विभागीय सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र आजतागायत नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण झालेले नाही.याबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन (सांगली) यांच्या वतीने मंगळवार दिनांक १६/०९/२०२५ रोजी महापालिका आयुक्त यांना सविस्तर कायदेशीर निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात प्रमुख मुद्दे :नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, गटर व जलनिस्सारण व्यवस्था, तसेच स्वच्छतेच्या सुविधा तात्काळ पुरवाव्यात.परिसरात घनकचरा व्यवस्थापन व किटकनाशक फवारणी नियमित करावी.प्रभाग समिती क्र ३, कुपवाड शहर तसेच इतर प्रभागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा राखीव निधी सुवर्ण वस्तीत खर्च केला आहे. राखीव निधीचा गैर वापर, संबंधित महापालिका विभागीय शाखा अभियंता यांनी केला आहे. तरी अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव निधीचा गैरवापर थांबवून, राज्य स्तरीय वरिष्ठ पातळीवरील स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.सर्व मागण्यांची अंमलबजावणी 30 दिवसांत करून नागरिकांना कार्यवाही अहवाल द्यावा.घटनात्मक व कायदेशीर आधार :भारतीय संविधानातील अनुच्छेद 21, 47, 243W, 275.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 63 व 66.महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य कायदा, 1949.सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय (Subhash Kumar, Ratlam Municipal Council, Bandhua Mukti Morcha, Chameli Singh प्रकरणे).निवेदनकर्ते :मा. प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. संजय भूपाल कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र सांगली.मा. मोहन पोपट साबळे, उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्र.मा. जगदिश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, यावेळी सदरच्या भागातील नागरिक सुविधा पासून वंचित असलेल्या ने त्रासलेले रहिवासी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निष्कर्ष :महापालिकेने तात्काळ कारवाई करून पाणी, गटर व नागरी सुविधा पुरवल्या नाहीत, तसेच राखीव निधीचा गैरवापर रोखला नाही तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट सांगली यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील. याची नोंद घ्यावी व दखल घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
माय माऊली न्यूज संपादक डॉ शाम जाधव 7248993599


