
शरद चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती आस्थापनेतील भोंगळा कारभार
नाशिक प्रतिनिधी – डॉ.शाम जाधव
नाशिक आज दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथिल शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील काही कर्मचारी यांचेवर बाजार समिती आस्थापनेतील भोंगळ कारभाराने अनुसूचित जातितील तसेच बहुजन कर्मचारी यांची पदोन्नति डावलून सेवाजेष्ठतेचे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू असल्यामुळे बाजार समिती कर्मचारी श्री.ए.के.गांगुर्डे,श्री.कदम यांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा वसा घेतला असून आजाद समाज पार्टी नाशिक जिल्हा युनिट च्या वतीने बाजार समिती कर्मचारी यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. बिंदूनामावली,सेवाजेष्ठता तथा बहुजन कर्मचारी यांचेवरील अन्यायाविरोधात आजाद समाज पार्टी रस्त्यावर उतरून न्यायासाठी लढा उभारेल व बहुजन कर्मचारी यांना न्याय मिळवून देईल असे यावेळी उपोषणकर्ते यांना आश्वासित करण्यात आले.त्याच बरोबर येत्या दोन दिवसात जिल्हा उपनिबंधक,नाशिक तथा बाजार समिती आस्थापना यांनी सदर कर्मचारी यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे त्यांचा हक्क त्यांना दिला नाही तर आजाद समाज पार्टी नाशिक जिल्हा युनिट च्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.यावेळी पक्षाचे युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे,उ.महाराष्ट्र महासचिव मुकेश गांगुर्डे, नाशिक जिल्हा प्रभारी पंकज साळवे,नाशिक जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे,नाशिक शहराध्यक्ष मनोज हिरे,जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


