

नाशिक नगरीत मायमाऊली शिवशक्ती गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न होणार
नाशिक वार्ताहर दि. 19सप्टेंबर 2025
मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन या राष्ट्रीय संस्था चे प्रथम वर्धापन दिन निमित्त प्रभू श्रीराम व माता सीता यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या नाशिक च्या पावन नगरीत सादर होणार मायमाऊली शिवशक्ती राज्यस्तरीय गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार सोहळा. या कार्यक्रम मध्ये विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान केला जाणार आहे. यामध्ये आध्यत्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, कला – अभिनय, पत्रकारिता, साहित्यिक ई क्षेत्रातील मान्यवरांनची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्था चे अध्यक्ष डॉ संदीप काकड यांनी दिली. संस्था च्या कार्याबद्दल माहिती देताना पुढे त्यांनी सांगितले कि, मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून गोर गरीब यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे वाटप, अन्नधान्य वाटप, वृद्धाश्रम अनाथ आश्रम दिव्यांग आश्रम आदिवासी पाडे ई ठिकाणी गरजेच्या वस्तू पुरवीने तसेच आर्थिक दृष्टीने गरजूना वैद्यकीय व शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत करणे यासारखे अनेक उपक्रम संस्था मार्फत केले जातात. तसेच संस्था तर्फे समुपदेशन, व्यसनमुक्ती, व वैद्यकीय शिबीर हि राबविले जातात. मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन अंतर्गत मायमाऊली गौशाल, मायमाऊली वृद्धाश्रम, मायमाऊली न्यूज, मायमाऊली अन्नछत्र, मायमाऊली सेवाश्रम, मायमाऊली मेडिटेशन केंद्र, मायमाऊली हिलिंग सेंटर आणि रुद्रा समुपदेशन केंद्र ई उपक्रम वर काम चालू आहे. संस्था च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर 2025 पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्या साठी मुख्य आयोजक डॉ संदीप काकड (9921390038) , डॉ शाम जाधव (7248993599), श्री मनिष मुथा (8956811122), श्री रामभाऊ आवारे (8788504512)तर आयोजक समिती मध्ये सर्व संस्था चे पदाधिकारी यांचा समावेश आहे. पुरस्कार सोहळा बद्दल अधिक माहिती साठी दिलेल्या मोबाईल नं वर चौकशी करण्यासाठी सांगण्यात आले आहे.


मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


