

बहुजन समाज पार्टी कडून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी नाशिक सहाय्यक मुख्यमंत्री कार्यालय यांना निवेदन
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक २६/९/२०२५ रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय नाशिक ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये भरपाई मिळण्याबाबत असे निवेदन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव माजी उपसरपच ओझर धर्मेंद्र मधुकर जाधव यांच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा.तुषार अशोक राव शेरेकर सहाय्यक महसूल अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय नाशिक यांच्यामार्फत देण्यात आले आहे की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे तोंडाशी पिके आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. मका, टोमॅटो, कांदा, सोयाबीन, कापूस, केळी तसेच फळबाग यांची नुकसान होऊन शेतकरी हवालदाल झालेला आहे. औषधे, खते, बियाणे मजुरी यामुळे त्रस्त झालेला आहे. दुबार पेरणी करूनही हाताशी काही हाती उत्पन्न नाही तर पैसा नाही, कोणी कडे जावे सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे, बँका दरवाजा वर उभे आहे त. शेतकऱ्यांना सांभाळणार कोण पोशिंदाच जिवंत राहणार नाही त्याचीच अशी मरमर होणार असेल तर त्यास वाचवणार कोण म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहे की ओला दुष्काळ जाहीर करून एकरी एक लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अन्यथा बसपाच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


