
कोपरगाव मधील सवंत्सर येथील श्रीराम दिव्यांग आश्रमातील व्यक्तींना किराणा वाटप
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
कोपरगाव आज दिनांक २७/९/२०२५ रोजी श्रीराम दिव्यांग आश्रम सवंत्सर चे संस्थापक तसेच अध्यक्ष श्री गोकुळ नामदेव पावडे यांनी आश्रमातील दिव्यांग व्यक्तींना किराणा वाटप केला. यावेळी या संस्थेचे उपाध्यक्ष पन्नालाल नेहरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच सर्वांना मदत तिच्या बाबतीत समजावून सांगितले . या ठिकाणी खजिनदार महेश जाधव तसेच इतर सदस्य ज्योती घुले उपस्थित होते. या संस्थेची स्थापना १३ डिसेंबर २०१८रोजी झालेली आहे. यावेळी या संस्थेच्या सदस्या ज्योती घुले यांनी सांगितलं दिव्यांगांना आधार स्वरूपाचा मदतीचा आधार म्हणजे आपली थोडीफार मदत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी महेश जाधव यांनी सर्वांना एक सुंदर असा संदेश दिला ते असे म्हणाले दिव्यांगांच्या जीवनात फुलवूया सुखाची किरण मायेचा ओलावा आणि मदतीचा हात .आयुष्यात जितकं आपल्याला देवाने दिल त्यातलं थोडं अशा व्यक्तींना द्या की ज्यांना आपल्या तुलनेत काहीच मिळत नाही आपण आज आहोत तर उद्या नाही त्यामुळे व्यक्तींना नेहमी मदत करत रहा. अशा प्रकारे सुंदर विचार आणि संदेशाने त्यांचा हा छोटासा कार्यक्रम त्याठिकाणी पार पडला. खरंतर या श्रीराम दिव्यांग आश्रमाने जो संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला तो खूप चांगला होता.



