
महाराष्ट्र शासन (गृह विभाग )नागरी संरक्षण दल नाशिक कॅपासिटी बिल्डिंग प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. 05/2025 समारोप संपन्न.
नाशिक प्रतिनिधी – डॉ संदीप काकड
दि. 3 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन (गृह विभाग) नागरी संरक्षण नाशिक *कपॅसिटी बिल्डिंग प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक 05/2025 कोर्स घेण्यात आला. हा कोर्स 24 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत के. एस. के. डब्लू कॉलेज सिडको नाशिक येथे घेण्यात आला. उपनियंत्रक श्री अतुल जगताप यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आला. या कोर्स साठी एकूण 40 विध्यार्थी स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.या पाठक्रम साठी सहाय्यक उपनियंत्रक श्री देवेंद्र बावस्कर व मास्टर ट्रेनर साक्षी निकुंभ यांनी प्रशिक्षण दिले. आपत्ती यवस्थापन, क्षमता बांधनी, रेस्क्यू, प्रथम उपचार, अग्नीक्षमन, ई विविध विषयांवर प्रशिक्षण दिले . शेवटच्या दिवशी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. शेवटच्या सत्रात समारोप कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये अध्यक्षस्थानी के एस के डब्लू कॉलेज चे प्राचार्य डॉ एस. के.कुशारे सर होते व उप प्राचार्य श्री घुले सर प्रमुख पाहुणे होते. सोबत पंचवटी विभाग क्षेत्ररक्षक श्री मनोहर जगताप, अंबड विभाग क्षेत्ररक्षक डॉ योगेंद्र पाटील, सहाय्यक उपनियंत्रक श्री देवेंद्र बावस्कर,भद्रकाली विभाग क्षेत्ररक्षिका मंगला काकड व मास्टर ट्रेनर साक्षी निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन स्वयंसेविका हर्षाली अडांगळे हिने केले. सर्व मान्यवरांचे पुष्पगुछ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर स्वयंसेवक ज्ञानेश्वर खोलमकर, डॉ संदीप काकड, सपना हानवते, पुजा बोचरे, तेजश्री गटकळ यांनी मनोगत व्यक्त केले. मंगला काकड, डॉ योगेंद्र पाटील, मनोहर जगताप यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. व नंतर कार्यक्रम चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के.कुशारे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम च्या शेवटी श्री देवेंद्र बावस्कर सर यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. सर्वांचा ग्रुप फोटो घेऊन कोर्स ची सांगता करण्यात आली.
मायमाऊली न्यूज साठी मुख्य संपादक -डॉ संदीप काकड


