
६९वा धम्मचक्र परिवर्तन दिन अशोका विजय दशमी साजरी बौ द्ध धम्मकार संघ सांगली श्रावस्ती विहार यांचा ३४ वा वर्धापन दिन साजरा
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली आज रोजी बौध्द धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने *६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयी दशमी* व *बौध्द धम्म संस्कार संघ सांगली, श्रावस्ती विहार सांगली चा 34 वा वर्धापन दिन* गुरुवार दि.०२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आयुष्यमती स्नेहल ताई सावंत अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ सांगली. यांचे हस्ते पंचरंगीध्वज फडकवून सलामी देण्यात आली.विहाराचे माजी सहखजिनदार जगन्नाथ आठवले यांनी सर्व उपस्थित पाहुणे वक्ते सर्व उपासक उपासिका यांचे स्वागत केले. प्रमुख वक्ते आयु. प्रज्योत ढाले व प्रा. आयु. दिलीप थोरावत यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध यांचे प्रतिमेचे धूप, दीप, सुगंध यांनी पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करणेत आली.कार्यक्रमाचे अद्यक्ष आयु.डॉ. सुधीर कोलप यांनी विहराचे वर्धापन दिनानिमित्त विहार उभारणी साठी सर्व संस्थापक अद्यक्ष व त्यांच्या सहकारी सदस्य सभासद यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचं विषयी कृत्यनघता व्यक्त केली. आयु.प्रा. प्रजोत ढाले यांनी अत्यन्त अभ्यास पुर्ण असे बौद्ध धम्म प्रचार व प्रसार याविषयी व आपली जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. श्रावस्ती विहाराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थापक संचालकांचा सत्कार घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव सन्मान पत्र देऊन करण्यात आला. प्रमुख पाहुणे स्नेहलताई सावन्त यांनी धम्मचक्रदिनाच्या व विहाराच्या वर्धापन दिनाच्या सर्व उपासका ना शुभेच्छा दिल्या. बिरेंद्र थोरात यांनी. मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.भारतीय बौद्धमहासभा अध्यक्ष. रुपेश तामगावकर यांनी आपले विचार व्यक्त करून सर्व बौद्ध बांधवानी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होणेसाठी आवाहन केले. श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष आयु.डॉ.कोलप यांनी विहाराच्या वर्धापण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सर्व उपासक उपासिका सदस्य यांनी या विहाराचे उभारणी मध्ये दिलेल्या योगदानातून,श्रमदानातून अर्थ दानातून हे विहार उभा आहे त्याबद्दल कृत्यनघता व्यक्त केली व यापुढे असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.सदर कार्यक्रमासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोस्तव मंडळाचे सर्व पदाधीकारी सदस्य श्रावस्ती विहाराचे पदाधिकारी व सदस्य वेगवेगळ्या भागातील बौद्ध उपासक उपस्थित होते शेवटी मैत्रीगीत व धम्म पालन गाथा होऊन कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी विलास सर्जे,विकास कांबळे, चेतन गाडे, एस आर माने सर, संजय घाडगेसर,प्रफुल्ल ठोकळे, प्रा.साबळे सर,माजी उपयुक्त. सी. बी चौधरी. माजी अद्यक्ष सोनूताई कांबळे , पुष्पाताई शेळके, मालन शिरगुपिकर,आदी सदस्य * सदर कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.


