

दीपस्तंभ पुरस्कार सोहळा व भारत श्री राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न
पालघर वाडा आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पि.जे. हायस्कूल जूनियर कॉलेज वाडा, पालघर, येथे आस्था संस्था महाराष्ट्र व न्यू इंडिया सोशल ट्रस्ट पालघर विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष डॉ.वीरेंद्र भोईर यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात पत्रकार व महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कर्तबदारीची दखल घेऊन ७० व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या गौरव सोहळ्यात रमेशगिरी गोसावी, रामचंद्र ताठे, डॉ. शाम जाधव वाडा पोलीस स्टेशनचे पी एस आय सागर माळकर, छ. संभाजीनगर चे निसर्गोपचार तज्ञ डॉ.रावसाहेब घोडेराव, बेळगाव कर्नाटकचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव रेडेकर, रायगडचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर पवार, संगीता मिसाळ, संदीप अहिरे आधी पत्रकार सन्मानित करण्यात आले अहिल्यानगरचे चित्रपट निर्माते काशिनाथ आव्हाड , रामभाऊ आवारे दैनिक महाभारत ,वाडा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी मोकाशी, वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शैला आढाव, ठाणे सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर आर्. एम. पाटील, जयप्रकाश पवार ( रायगड पत्रकार संघटना अध्यक्ष ) सामाजिक कार्यकर्ते राजनंदिनी अहिरे, साहेबराव पवार, हेमांगीताई पाटील, सुचिताताई रोठे, मंदाताई कांबळे , व इतर मान्यवर उपस्थित होते.


