
राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव कल्याण.आज रोजी मराठी साहित्य मंडळ ठाणे आयोजित १४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आटगाव (कल्याण )येथे झाले. यात नासिकच्या जेष्ठ कवयित्री सौ. सुनंदा साहेबराव पाटील यांच्या “चैत्रपालवी “या कविता संग्रहास “राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार” मिळाला आहे .५ ऑक्टोंबर रोजी साहित्य संमेलन झाले .तसेच” पद्माश्री चॅरिटेबल ट्रस्ट “यांचेकडून श्री शंकराचार्य कृतकोटी सभागृहात ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता त्यांना “कर्तुत्वाचे शिल्पकार”हा पुरस्कार मिळाला. शाही सन्मान झाला. तसेच २७ सप्टेंबर रोजी त्यांना मनू मानसी संस्थेकडून दीप लक्ष्मी बँक्वेट हॉल नासिक येथे “नवदुर्गा” पुरस्कार मिळाला या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


