

तराडी येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या फलक अनावरण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिरपूर तालुक्यातील तराडी आज रोजी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या फलक अनावरणाचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय शिरपूर येथील दिनेश भाऊ कोळी व दिलीप कंट्रक्शन ठेकेदार दिलीप भाऊ कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी तराडी कोळी समाज बांधव, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलक अनावरणानंतर प्रमुख पाहुणे दिनेश भाऊ कोळी यांनी आपल्या मनोगतातून महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या महान कार्याचा आणि त्यांच्या समाजातील योगदानाचा सखोल परिचय समाज बांधवांना करून दिला. त्यांनी सांगितले की, “महर्षी वाल्मिक हे आदर्श जीवनाचे प्रतीक असून त्यांनी समाजाला नैतिकता, ज्ञान आणि धर्ममार्ग दाखवला.”कार्यक्रमादरम्यान राहुल कोळी व सागर कोळी यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. त्यांनी समाज एकता, शिक्षण आणि संस्कार या विषयांवर महत्त्वपूर्ण विचार मांडले.हा कार्यक्रम कपिल कोळी पावभा कोळी अनिकेत कोळी रावसाहेब कोळी सुनील कोळी सागर कोळी नितीन कोळी व वर्चस्व प्रतिष्ठान, वाल्मीक चौक, तहाडी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची सुंदर आखणी करून त्याचे यशस्वी आयोजन केले.शेवटी उपस्थित सर्व समाज बांधवांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


