

धर्मांतर घोषणा ९० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक येवला. आज दिनांक १३/१०/२०२५ रोजी धर्मांतर घोषणेचा ९० वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा व ६० फुटी धम्मध्वजाचे अनावरण डॉ . भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न ! मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा येवला मुक्कामी विश्वरत्न संविधान निर्मार्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी केले यांच्या धम्माचा गाडा पुढे नेता येत नसेल तर तो गाडा थांबू नका असे सांगितले होते ! आता तो मी गाडा थांबू देणार नाही ! – डॉ .भिमराव यशवंतराव आंबेडकर कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दलयेवला या ठिकाणी सकाळी धम्म रॅली काढून संपूर्ण येवला शहरांमध्ये पंचशील ध्वज घेऊन समता बंधुता राखण्यासाठी धम्मरैली संपूर्ण येवल्यामध्ये एक धम्माकडे वाटचाल करणारा असा क्षण ! या कार्यक्रमासाठी दि . बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे मा .भिमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांनी ६०फुटी धम्म ध्वजाचे अनावरण त्याच्या हस्ते करण्यात आले .भिमराव साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की संपूर्ण भारतामध्ये महाबोधी विहार आंदोलन चालु आहे . ते आंदोलन अधिक तीव्र करणारा असणारे सांगण्यात आले ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध विहारावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेवर अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमण जागेचा ताबा लवकरच भारतीय बौद्ध महासभा घेणार आहे भारतीय बौद्ध महासभेचे बुद्ध विहार आहे बुद्ध मुर्त्या आहे त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ही चळवळ गतिमान करणार आहे अनेक ठिकाणी समता सैनिक दलाचे लाखोच्या संख्येने भारतभर समता सैनिक शिबिर राबवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये शाखा निर्माण करणार आहे . भारतीय बौद्ध महासभे मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला होता त्या स्पर्धकांना ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमानंतर भव्य सभा मा .भाऊसाहेब जाधव (जिल्हा अध्यक्ष नाशिक ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .मा . एस के भंडारे गुरुजी कमांडर समता सैनिक दल यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये समता सैनिक दलाचे लाखो सैनिक आज तयार झालेले आहे व पुढेही लाखो समता सैनिक तयार करणार आहे .या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया राष्ट्रीय प्रमुख वक्ते जगदीश गवई बीएच गायकवाड गुरुजी , एमडी सरोदे गुरुजी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोगे सरचिटणीस नाशिक यांनी केले तर स्वागताध्यक्ष दिपक गरुड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. दि .बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांची बुद्धिस्ट ग्रामपंचायत संघ राष्ट्रीय अध्यक्ष मा . सातवे जिल्हाध्यक्ष मा .मोहन जमदाडे यांनी पंचशील ध्वज दान करून सर्व खर्च करून निर्माण केला म्हणून भिमराव आंबेडकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ! कार्यक्रमासाठी प्रमुख रामा केदारे,रवी सोनवणे ,अरुण घोडेराव ,भीमराव वाघ, बाबुराव पगारे ,प्रवीण खळे ,अमोल गायकवाड ,सुनील सोनवणे अमोल सोनवणे, भाऊसाहेब झाल्टे,अर्जुन डोखे ,विजय गायकवाड ,बाळू गायकवाड अमोल पगारे, सुरेखा लोखंडे महिला अध्यक्ष सुरेखा बर्वे ,पवार, ताई मेघे ताई आधी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यात आले होते व भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की या धर्मातर घोषणा भूमीला वॉल कंपाऊंड करणार आहे . शिवाय सुमेध भंते यांनी भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली पुढे विकास कामे जोरात चालू आहे आणि धम्माची चळवळ जोरात महाराष्ट्रभर सुरू ठेवणार आहे .श्रामेर शिबिर व भारतीय बौद्ध महासभेचे शिबिर मोठ्या संख्येने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले .


