
*#मुंढवा_महार_वतन_जमीन लुटण्याचा कट उघड:*
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानंतर शेतकरी जमीन परत मिळवण्याच्या निर्णायक लढाईत उतरले !
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
पुण्यात आज शनिवार दिनांक ०८नोव्हेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि महार वतनाचे पीडित शेतकरी यांनी आदरणीय_बाळासाहेब_आंबेडकर यांची भेट घेऊन मुंढवा येथील ४३ एकर वतन जमिनी वरील अन्यायाची संपूर्ण माहिती दिली. शेतकऱ्यांनी सांगितलेल्या तपशीलांमधून ह्या व्यवहारात वंचित समाजाच्या हक्कांवर स्पष्ट गदा आणण्यात आल्याचे मत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. या प्रकरणातील गैरव्यवहार, जमीन अवैधपणे विक्री, स्टॅम्प ड्युटी माफी आणि सत्ताधाऱ्यांची दिसणारी मिलीभगत या सर्व बाबींवर बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी व पदाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. पुढील कायदेशीर लढाई कशी लढावी, कोणत्या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि जमीन मूळ वतनदारांकडे परत आणण्यासाठी कोणती पावलं घ्यावी, याबाबत त्यांनी ठोस मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनामुळे शेतकरी व पदाधिकारी यांच्यात नव्यानं आत्मविश्वास निर्माण झाला असून “वंचितांच्या हक्कांवर कुणीही गदा आणू शकत नाही, आणि ही जमीन निश्चितच वतनदारांना परत मिळणार” असा ठाम विश्वास शेतकरी व पदाधिकारी यांनी व्यक्त केला.यावेळी अरविंद तायडे (वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष,), सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), स्वप्निल वाघमारे, नितीन कांबळे, विपुल सोनवणे,राजभाऊ ढाले,जॉर्ज मदनकर,अजित वाघमारे उपस्थित होते.


