
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती डॉ. शाम जाधव नाशिक जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
नाशिक प्रतिनिधी मनीष मुथा
पिंपळगाव खेडगाव, आज दिनांक १६/११/२०२५ रोजी ता दिंडोरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील खंडापूरकर यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, राष्ट्रीय संघटक अरूणभाऊ देशमुख, निवडसमिती अध्यक्ष अनिलदादा देसले, सैनिक विभाग प्रदेश अध्यक्ष उल्हासदादा पाटील, ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन चे प्रदेश अध्यक्ष सूनिलभाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मच्छिंद्र मगर, महिला प्रदेश कार्यध्यक्ष निर्मलाताई बुल्हे, उपाध्यक्ष गोरख आहिरे, उपाध्यक्ष पुजाताई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खेडगाव येथिल ग्रामस्थांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रयत्नशील असलेले पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, नाशिक जिल्हाध्यक्ष दिव्यांग विभाग सूरदास पावसे, तालुका उपाध्यक्ष ज्योतीताई गरूड, मोनाली सुर्यवंशी, ओझर दि. वि. अध्यक्ष एकनाथ लोखंडे यांनी उत्तम पध्दतीने कार्यक्रमाचे नियोजन केले.
शाखा उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचेकडून करण्यात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, नाशिक जिल्हा महिला संपर्कप्रमुख सुनिताताई गांगुर्डे, नाशिक जिल्हा सरचिटणीस डॉ. शामभाऊ जाधव, तालुका उपाध्यक्ष राहुल मोरे, नाशिक जिल्हाध्यक्ष दि वि. सूरदास पावसे, खेडगाव येथिल कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.


