
माता रमाबाई आंबेडकर विद्यालय सविधान दिनानिमित्त शालेय वस्तू वाटप
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक२६/११/२०२५आज रोजी संविधान दिनी माता रमाबाई आंबेडकर विद्यालय नाशिक येथे ५ वी ते १२ वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनींना स्कूल बॅग,१२ वह्या, कंपास पेटी, पेन आणि भीम योद्धा प्रशीस्त गौरव प्रमाणपत्र उर्वरित सर्व विद्यार्थिनींना २००पेजेस वही, पेन भेट म्हणून अदा करण्यात आले. यासाठी प्राचार्य आयु. रूपाली जोपुलकर मॅडम यांचे सहकार्य झाल्याने आयु. बुधाजी वाढविंदे साहेब अध्यक्ष महा.राज्य, आयु. हेमंत जाधव साहेब महासचिव महा. राज्य, आयु. निरंजन जाधव सर, आयु. रंभाबाई भालेराव मॅडम जिल्हा अध्यक्षा. आयु ॲड सुधाकरजी के.अहिरे साहेब. उपाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा नाशिक, आयु. शालिनी अहिरे तालुका उपाध्यक्ष, आयु. जयश्री पवार मॅडम, देवळा तालुका अध्यक्ष, भा.बौ.महासभा यांचे कडून देण्यात येऊन गौरविण्यात आले.तसेच माजी पदाधिकारी डॉ. गौतम खरे साहेब, डॉ. अशोक पगारे सर, PSI महेन्द्र बर्वे, अशोक मोरे सर भा बौ महासभा सदर कार्यक्रमास उपस्थित होते. वरिष्ठ ॲड. जयदीप मोरे आणि ॲड ए. ए पठाण साहेब हजर होते. प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आंबेडकर, आणि तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करण्यात येऊन पंचशील व संविधान शपथ ग्रहण करून उपस्थित विद्यार्थी यांना संविधान बाबत वक्ते यांनी भाषणे केली आणि संविधानाचे महत्त्व,उपयोग समजुन सांगितला आणि उपस्थित यांचे आभार मानून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जय संविधान, जय भीम.


