
पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.’शिक्षण मंडळ भगूर’ संचालित *नूतन प्राथमिक विद्यामंदिर, नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव नाशिक भगूर येथे आज मंगळवार, दि. ८ जुलै २०२५ रोजी पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा व शाळेच्या मुख्या. सौ. रंजना बाळासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भिकाजी कवडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा.श्री. रंगनाथ जाधव, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. रेखाताई कुलकर्णी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात विद्याभारती सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यांनतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे मार्फत आयोजित गणित प्रवेश परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. श्रीम. भागवत मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समितीची आवश्यकता, रचना व कार्य याबाबत पालकांना माहिती दिली. प्रमुख अतिथी मा.श्री. कवडे सर यांनी पालकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने पालकांनी अधिक सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रंजना सोनवणे मॅडम यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढ व शालेय शिस्त याबाबत पालकांशी सुसंवाद संवाद साधला. सभेच्या निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीच्या मागील कार्यकारिणीस निरोप देण्यात आला व नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक
डॉ संदीप काकड


