
प्राचार्य सी डी रोटे यांचा शनिवार रोजी मंजुळा लॉन्स येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा तसेच कै.कमळाबाई दगु रोटे गुणवंत रयत सेवक सन्मान सोहळा
निफाड प्रतिनिधी – रामभाऊ आवारे
वनसगाव तालुका निफाड येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आदर्श प्राचार्य सी डी रोटे यांचा २३ ऑगस्ट शनिवार रोजी लासलगाव – विंचूर रोडवरील मंजुळा लॉन्स A येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा व कै. कमलाबाई दगू रोटे गुणवंत रयत सेवक सन्मान सोहळा सकाळी १०.३० वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक पर्यवेक्षक सोनवणे आर.व्ही वनसगाव ,सौ.प्राची आकाश फापाळे, प्रफुल्ल चिंधु रोटे, डॉ.साक्षी चिंधू रोटे व समस्त रोटे परिवार यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव महिपतराव डुंबरे सदस्य-स्थानिक स्कुल कमिटी, शुभहस्ते मा.डॉ.सुजित गुंजाळ जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, ह.भ.प.गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे (रामकृष्ण हरी साधना आश्रम रुई), मा.वि.ग.बोरस्ते साहेब (माजी शिक्षणाधिकारी नाशिक),मा.श्री.मुलाणी साहेब (माजी विस्तार अधिकारी प.स. निफाड),मा.सौ.रत्नाताई चांदगुडे संस्थापक अध्यक्ष साई वात्सल्य सेवाभावी संस्था शिर्डी, तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.नवनाथ बोडके सो विभागीय अधिकारी उ.वि. अहिल्यानगर,मा.श्री.प्रशांत गायकवाड सो.गट शिक्षणधिकारी प.स.निफाड, मा.श्री.दत्तात्रय तुकाराम डुकरे माजी चेअरमन रा.सा.का.(जिल्हा कार्याध्यक्ष वारकरी महामंडळ),मा.श्री नंदकुमार देवढे प्राचार्य विंचुर गटप्रमुख, मा.श्री.प्रमोद तोरणे साो.(सह विभागीय अधिकारी उ वि.अहिल्यानगर),मा.श्री.अशोक दुधारे शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त, मा.श्री.डी.एस.वडजे बापु मा. मॅनेजिंग कौन्सिल सदस्य र.शि.सं.सातारा, मा.श्री. रविंद्र मोरे शिक्षक नेते तसेच नाशिक व अहिल्यानगर रयत शिक्षण संस्था आजी व माजी लाईफ मेंबर व वर्कर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ, स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, विशाखा समिती, सखी सावित्री समिती, पत्रकार संघ, माजी विद्यार्थी संघ, पालक ग्रामस्थ सर्व सेवक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वनसगाव आदी उपस्थित राहणार आहे.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


