
*जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे “” दीप स्तंभ पुरस्कार “” ने सन्मानित
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
नासिक शुक्ल यजूरवेदिय माध्यनंदिन ब्राह्मण संस्था, नासिक यांचे कडुन ऋषीं पंचमी च्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे याना प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष देशपांडे यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उप अध्यक्ष आडवोकेट भानुदास शौचे, व अन्य पदाधिकारी व्यासपीठ वर उपस्थित होते. दीप स्तंभ पुरस्कार च्या सन्मान पत्र मध्ये सन्मानित करताना असे लिहिले आहे कि, “”आपले कार्य दीप स्तंभ सारखे आहे. समस्त विश्व् कल्याण करिता आपण करीत असलेले धर्म कार्य, सेवा कार्य हे अलोकिक स्वरूपाचे आहे. ऋषीं पंचमीचे दिवशी ऋषीं तुल्य व्यक्तिमत्व म्हणुन आपले पूजन करून सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या कार्या प्रती, ब्राह्मण संस्थे ला अभिमान व कृतज्ञता सन्मान पत्र देऊन ब्राह्मण संस्थे ने व्यक्त केली आहे. ऋषीं पंचमी दिवशी,संस्थे तर्फे आयोजित कार्यक्रम मध्ये सन्मान पत्र हे आदर पूर्वक प्रदान केले आहे , दीप स्तंभ पुरस्कार सुहास टिपरे व सौं संजीवनी सुहास टिपरे या दोघांना व्यास पिठावर सन्मानाने, प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष देशपांडे यांचे हस्ते पूणेरी पगडी, सन्मान पत्र, शाल व सौं संजीवनी सुहास टिपरे यांची ओटी भरून सन्मानित केलें आहे सुहास टिपरे व सौं संजीवनी सुहास टिपरे यांचे सर्व क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे!!


