
*नूतन प्राथमिक विद्यामंदिर, भगूर येथे शिक्षकदिन साजरा.*
नाशिक प्रतिनिधी – डॉ.शाम जाधव
भगूर: नूतन प्राथमिक विद्यामंदिर, भगूर शाळेत पालक-शिक्षक संघामार्फत शिक्षकदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण मंडळ संस्थेच्या सदस्या *मा. श्रीम. हेमांगीताई पाटील* यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुरेखा कानवडे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सहाणे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना सोनवणे यांचे हस्ते शॉल व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यानंतर सौ.प्रिती देशमुख व सौ. प्रतिक्षा खंडिझोड (सदस्य, शा. व्य. समिती) यांनी शिक्षक यादीचे वाचन केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.तसेच शिक्षकदिनाच्या निमित्ताने शाळेत अध्यापनाचे काम करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांचाही भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सौ. गायखे मॅडम यांनी सत्काराला उत्तर देतांना पालक शिक्षक संघाचे आभार मानले. यानंतर ह.भ.प.राहुल महाराज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित केले.तसेच प्रमुख अतिथी श्री. शाम शिंदे, डॉ.श्री. तुषार साखरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.हेमांगीताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी मा.श्री. शाम खंडेराव शिंदे ( सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे.), मा.श्री. ह.भ.प. राहुल महाराज गायकवाड (लहवित),मा. श्री.शांताराम बापू शेटे (सदस्य,शालेय समिती), सौ. वासंतीताई रहाणे (सदस्या,शालेय समिती), मा.सौ.उषा परदेशी ( माजी मुख्याध्यापिका), मा.सौ.छाया कटारे ( माजी मुख्याध्यापिका), डॉ.श्री.तुषार चंद्रकांत साखरे (माजी विद्यार्थी), तसेच आरोग्य सेवक श्री. योगेश मनोहर (सदस्य, सुरक्षा समिती) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शा. व्य. समितीचे सदस्य श्री. रविंद्र देवरे यांनी केले तर सौ. अश्विनी करंजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक शिक्षक संघ / शा. व्य. समितीचे सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


