

भरविर खुर्द वाघाची दहशतीत ४४ जनावर फस्त
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
भरविर खुर्द आज दिनांक ८/९/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास गावामध्ये भर दिवसा बाळू काशिनाथ बांडे व समाधान उर्फ काका काशिनाथ बांडे यांच्या रहात्या घरात वाघाची दहशत बाळू काशिनाथ बांडे व समाधान उर्फ काका काशिनाथ बांडे यांच्या घरात दिवसा 3 वाजेच्या सुमारास वाघ शिरला असता त्यांच्या घरातील शेळ्या ७ व लहान बकरे ३७ असे एकूण ४४ शेळ्या फडशा उडविला व वाघ तेथून पसार झाला तसेच इगतपुरी येथील वन विभाग यांना तात्काळ पाचारण करण्यात आले या घटनेची फोनवर माहिती देण्यात आली वन विभागाची अधिकारी व वनरक्षक तात्काळ घटनास्थळी हजर झाले व पंचनामा करण्यात आला रात्री खूप उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते व गावातील सर्व गावकरी घटनास्थळी हजर होते तसेच वनविभागाचे कर्मचारी भुसाळ के एस (वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी भोये डि पी ( वनविभाग )लोखंडे एस वाय (वनरक्षक )बागुल जी डी (वनरक्षक ) पोटींदे के एल (वनरक्षक )आंबेकर सिताराम (कर्मचारी )मदगे अर्जुन (वनमजूर )हे सर्व माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले होते व गावातील पोलिस पाटील रमेश टोचे, भास्कर सारुकते सचिन गोडे, विकास कोकणे सोमनाथ टोचे,भावराव माळी दत्ता दौंडे,जगन शिंदे,बंडू शिंदे रामदास टोचे,नवनाथ सारूक्ते तसेच गावातील सर्व लहान लहान थोर व महिला घटना स्थळी हजर झाले होते खुप गरीब कष्टाळू व मेहनती दोघे भाऊ मोल मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे त्याची लहान लहान मुले आहेत कुठलाही आधार नाही तरी या गरीब आदिवासी कुटुंबांना वनपरिक्षेत्र अधिकारी शासनाने व वनविभागाने भरपाई द्यावी सदरील कुटुंबाचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले असून त्यांची उणीव भरून काढावे असे अशी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली व वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी डी पी भोये मॅडम यांनी पण सांगितले आहे की आम्ही तुम्हाला मदत देण्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न करू वाघाने जणू काही ह्या कुटुंबावर आघात करून बेखर करण्याचा प्रयत्न पूर्ण केला आहे कोणताही सहारा नसताना आपल्या उपजीविका शिशुपालन या जीविक याचे एकमेव साधन होते गावकऱ्यांनी वनविभागाला एक मागणी केली असून येथे एक पिंजरा कायमस्वरूपी ठेवावा कारण इथे जंगल असून कधीही मानव किंवा जनावर हल्ला होऊ शकतो



