


दि. 13 सप्टेंबर शनिवार रोजी कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड.पेठ वडगाव येथील सेमिनार हॉलमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत आय कार्ड व नियुक्तीपत्र वाटप सोहळा हा कार्यक्रम सकाळी 11:30 वाजता सुरू झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड पेठ वडगाव च्या प्राचार्या डॉ. श्वेता सचिन चौगुले (राष्ट्रीय महिला अध्यक्ष कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन) तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सुनील परदेशी (कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष ), श्री प्रमोद शिंदे पी आय (पेठ वडगाव पोलीस इन्स्पेक्टर), सौ संगीता शिंदे (कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा महिला), डॉ. संभाजी भोसले(पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सल्लागार कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन) , शाहीन चौगुले (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष KPM फाउंडेशन),श्री अशोक पुरोहित (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष KPM फाउंडेशन), डॉ. लता पाटील (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष KPMफाउंडेशन), श्री आनंदा मकोटे (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष KPM फाउंडेशन), इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा इत्यादी जिल्ह्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथम प्रतिमापूजन, स्वागत, प्रास्ताविक ,पाहुण्यांची ओळख, मान्यवरांचे मार्गदर्शन, आय कार्ड वाटप व पदनियुक्तीपत्र वाटप, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे भाषण अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातील 90 पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे पदभार व नियुक्तीपत्र यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये आय कार्ड,बॅच व नियुक्तीपत्र अशा स्वरूपात सन्मान करण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत काम करत असताना कोणत्या प्रकारे व कसे काम करावे यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे याविषयी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील परदेशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच वडगाव नगरीचे पोलीस इन्स्पेक्टर प्रमोद शिंदे यांनीही पोलीस व पोलीस मित्र संस्थेचे सदस्य यांच्या दरम्यान कसे आंतरसंबंध असले पाहिजेत व कोणत्या प्रकारे सहकार्य वृत्तीतून काम केले पाहिजे याविषयी मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. श्वेता चौगुले यांनी हे सर्व पदाधिकाऱ्यांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्र मध्ये काम करत असताना कोणत्या स्वरूपाचे काम केले पाहिजे याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम घेण्यामागील उद्देशही त्यांनी सांगितला. सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन मध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापिका प्रगती चौगुले, पाहुण्यांची ओळख प्रा. अमृता सावंत यांनी केली व आभार प्रा. वनिता चव्हाण यांनी केले. कोल्हापूर, सातारा, सांगली या तीनही जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांनी उत्साहाने पदग्रहण केले व पुढील कार्य करण्यासाठी शपथही घेतली. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन मध्ये विशेष कार्य करणाऱ्यांसाठी ही सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यामध्ये वृक्ष व संविधान प्रेम अशा स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. त्यामध्ये कल्याणी चव्हाण, आनंदा मकोटे यांचा सन्मान करण्यात आला. विशेष सहकार्याबद्दल रणजीत चव्हाण, विशाल पाटील, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव चा स्टाफ , छात्राध्यापक, छात्राध्यापिका, प्रगती चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. अशाप्रकारे हा पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन ऑल इंडिया कार्यक्षेत्र अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र विभागाचा आय कार्ड व नियुक्तीपत्र वाटप सोहळा कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव येथे संपन्न .


मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


