
नाशिक : युनिटी फाउंडेशन तर्फे आयोजित “नवरत्न पुरस्कार २०२५” सोहळा अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका यांचा योगदान सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आशोका CCA हॉल, युनिट फाउंडेशन तर्फे आयोजित नवरत्न पुरस्कार २०२५ सोहळा व सेंटर ऑफ अमेरिकाचा योगदान नाशिक येथे अत्यंत दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. एकता कदम यांनी भूषविले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रांत योगदान ओळखून गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण, समाजकारण, कला, साहित्य, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान नवरत्न पुरस्काराने करण्यात आला.कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली .कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून अश्विनी न्याहारकर (WOW ग्रुप संस्थापक), सौ. शिलावंती (माई) कैलास त्रिभुवणे – ज्येष्ठ समाजसेविका, अॅड. विन्या नागरे, योगिता निकम , अर्चना भाबड नासिक रोड पूर्व विधानसभा अध्यक्ष युवती सेना, सरिका वितोरे ,ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी व स्वाती ताई जाधव

अॅड. एकता कदम यांनी मनोगतात सांगितले की —“युनिटी फाउंडेशन नवरत्न पुरस्कार हा केवळ गौरव नाही तर समाजातील कार्यकर्त्यांच्या सेवाभावाला दिलेली खरी दाद आहे. सकारात्मक कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून आम्ही समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.”या सोहळ्यास अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. सभागृहात गौरव व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


